गांगीन जंगलात पोलिस-नक्षल चकमक

0
11

गडचिरोली-: कुरखेडा तालुक्यात नक्षल्यांनी दोन इसमांची हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना आज पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली.

नक्षल्यांनी २४ एप्रिलला मालेवाडा पोलिस ठाण्यांतर्गत दोन जणांची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र केले. आज सकाळी कोरची तालुक्यातील कोटगल पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. मात्र पोलिसांनी जोरदार प्रत्युतर दिल्याने नक्षलवादी जंगलात पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरुन पिट्टू व अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे.