गुंडेरा गावाजवळच्या रस्त्यावर नक्षल्यांचे बॅनर

0
8

सिरोंचा-सिरोंचाकडे जाणाऱ्या मार्गावरील गुंडेरा गावाजवळ नक्षल्यांनी लाकडे आडवी टाकून बॅनर बांधल्याने वाहतूक प्रभावीत झाली आहे.आज सकाळी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना बॅनर बांधल्याचे आढळून आले. १ ते ३१ मेपर्यंत महिनाभर विस्थापनविरोधी आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन नक्षल्यांनी या बॅनरद्वारे केले आहे. जल, जंगल, जमीन व अन्य नैसर्गिक संसाधनांवर आदिवासींचा अधिकार आहे. त्यामुळे सरकारने कार्पोरेट घराण्यांशी केलेले करार रद्द करावे, आदिवासीसाठी अन्यायकारक असलेले ऑपरेशन ग्रीन हंट तत्काळ बंद करावे, असा मजकूर बॅनरवर लिहिलेला आहे.