युग हत्याकांड प्रकरणातील आरोपींची फाशी कायम

0
8
नागपूर. दि. ५ : संपूर्ण राज्यात खळबळ उडविणाºया युग चांडक अपहरण व खून खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपींची फाशीची शिक्षा कामय ठेवली आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींना दुहेरी फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे आहे.
 1 सप्टेंबर 2014 रोजी राजेश धनालाल दवारे (वय 19) आणि अरविंद अभिलाष सिंग (वय 23) या दोन आरोपींनी युग चांडक या शाळकरी मुलाचे अपहरण करुन खून केला होता. दोन्ही आरोपींविरुद्ध लावण्यात आलेले आरोप जिल्हा न्यायालयात सिद्ध झाले. याअंतर्गत दोघांनाही दुहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.