गोमांसबंदी, दारुबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान – गोदरेज

0
13

मुंबई – गोदरेज उद्योगसमूहाचे अध्यक्ष अदी गोदरेज यांनी गोमांस आणि मद्यावर लादण्यात आलेल्या बंदीमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होत असल्याचे परखड मत व्यक्त केले आहे. सरकारकडून गेल्या दोन वर्षांत राबविण्यात आलेल्या अर्थिक धोरणांची गोदरेज यांनी यावेळी प्रशंसा केली; मात्र गोमांसबंदी व मद्यबंदीसंदर्भात त्यांनी नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.

व्यवसायास पूरक धोरण राबविण्यात आल्याने खरच फायदा झाला आहे. याचबरोबर, कमोडिटीजची किंमत कमी झाल्यानेही किफायतशीर वातावरण निर्माण झाले आहे. सर्वाधिक वेगाने विकसित पावणारी भारत ही अर्थव्यवस्था असेल, असे मला वाटते. भारत हा हळुहळू एक प्रभावशाली विकसित देश म्हणून उदयास येईल, असे गोदरेज म्हणाले.