महिलेसह चौघांनी घेतले विष, तिघांचा मृत्‍यू

0
8
बुलडाणा – बुलडाणा जिल्‍ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्‍या मालठाणा येथे एका आदिवासी शेतकरी कुटुंबातील चार सदस्‍यांनी विष प्राशन करून सामूहिक आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला आहे. यामध्‍ये तीन जणांचा मृत्‍यू झाला. तर, एक जण अत्यवस्थ असल्‍याची माहिती आहे. त्‍याच्‍यावर अकोला येथे उपचार सुरू आहे.मृतांची नावे – – दिनेश मसाने, वय 35 वर्ष, लक्ष्मीबाई मसाने, वय 40 वर्ष, जितेंद्र मसाने, वय 17 वर्ष