नागपुरात अडीच हजार कोटींचा डब्बा ट्रेडिंग शेअर्स घोटाळा

0
11

नागपूर : डब्बा ट्रेडिंगद्वारे अडीच हजार कोटींचा शेअर्स घोटाळा करणार्‍या नागपूर येथील समांतर स्टॉक एक्सचेंजचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी नागपूर शहर गुन्हे शाखेच्या आर्थिक पथकाने गुरुवारी एकाच वेळी एस. के. इन्व्हेस्टमेंट, अथर्व सिक्युरिटी, एल सेव्हन ग्रुपसह १0 ठिकाणी छापे मारून या घोटाळ्य़ाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे व लाखो रुपये जप्त करण्यात आले. यामुळे येथे एकच खळबळ उडाली असून, शेअर्स ट्रेडिंगचा व्यवहार करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
नागपूर शहर पोलीस दलास एल-सेव्हन ग्रुपचे रवी अग्रवाल यांनी सुमारे ४00 लोखंडी बॅरिकेट्स तयार करून दिल्याचे वृत्त आहे.या प्रकरणी एस. के. इन्व्हेस्टमेंट रामदासपेठ या फर्मचे प्रोप्रायटर कुशल किशोर लद्धड, श्रीमती वीणा घनश्याम सारडा (रा. सारडा हाउस, शिवाजीनगर, रामनगर चौक) यांच्यासह २0 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कुशल किशोर लद्धड यांनी एस. के. इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली सबब्रोकरशिप घेऊन डिमेट खात्याच्या माध्यमातून रजिस्टर नसलेल्या ग्राहक आरोपी वीणा सारडा यांच्याशी कट रचून २५00 कोटी रुपयांचा डब्बा ट्रेडिंग व्यवहार केला. यात मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, सेबी व शासनाची फसवणूक केल्याचे निदशर्नास आले. यात आणखी काही फर्म व व्यक्ती गुंतले असल्याचे त्यांच्या निदशर्नास आले. या घोटाळ्य़ाशी संबंधितांचा माग घेऊन गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी एकाच वेळी कुशल किशोर लद्धड (एस. के. इन्व्हेस्टमेंट, रामदासपेठ नागपूर), प्रितेश लखोटिया (अथर्व सिक्युरिटी गांधीबाग), दिनेश सारडा (क्वेटा कॉलनी), रवी अग्रवाल (एल-सेव्हन ग्रुप टेलिफोन एक्सचेंज चौक) आणि याच कंपनीचे आंबेडकर चौक येथील कार्यालय, गोपी मालू (जे. के. इन्व्हेस्टमेंट आंबेडकर चौक), अभिषेक बजाज (आंबेडकर चौक), सचिन अग्रवाल (आंबेडकर चौक), कन्नी थावरानी (टेलिफोन एक्सचेंज चौक), दिनेश गोखलानी (टेलिफोन एक्सचेंज चौक) व श्रीमती वीणा घनश्याम सारडा (रा. सारडा हाउस, शिवाजीनगर, रामनगर चौक) अशा एकूण ११ ठिकाणी छापे मारून मोठय़ा प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला.

शहर गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान नागपूर येथे गैरकायदेशीरपणे शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार बनावट सॉफटवेअरच्या आधारे करतात, अशी माहिती मिळाल्याने आरोपींचा माग घेऊन मुंबई येथील सेबीच्या अधिकार्‍यांच्या मदतीने छापामार कारवाई करून झडती घेण्यात आली. दरम्यान, कुशल किशोर लद्धड यांनी २00२ पासून एस. के. इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली सबब्रोकरशिप घेऊन समांतर स्टॉक एक्सचेंज चालवून सेबीची मान्यता नसताना डब्बा ट्रेडिंगद्वारे कोट्यवधींचा शेअर्स खरेदी-विक्रीचा व्यवहार केला असल्याचे उघडकीस आले. स्टॉक एक्सचेंजद्वारे शेअर्स खरेदी-विक्री करताना डिमेट खाते उघडणे आवश्यक असते. शेअर्सचे ट्रेडिंग केल्यानंतर या व्यवहाराचा चेक डिमेट खात्यात जमा होता. हा सर्व व्यवहार पारदश्री असतो. शेअर्स खरेदी-विक्री करताना डेली ट्रेडिंग व लाँगटर्न ट्रेडिंग अशा दोन प्रकारे व्यवहार करण्यात येतो. डेली ट्रेडिंगमध्ये दररोज शेअर्स बाजार सुरू झाल्यापासून दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत शेअर्सची खरेदी-विक्री करण्यात येते. लाँगटर्नमध्ये खरेदी केलेले शेअर्स आपल्या सोयीने विकता येतात. ट्रेडिंगचा व्यवहार शेअर्स ब्रोकर्सच्या दलालामार्फत चालतो.