शहापूर शिवारात आठ लांडोरांचा मृत्यू

0
9

मंगरूळपीर (वाशीम) : शहापूर शिवारात गुरुवारी सकाळी आठ लांडोर मृतावस्थेत आढळले. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोर व लांडोर वास्तव्यास आहेत.

शहापुरातील किशोर जावळे हे गुरुवारी सकाळी शेतात गेले असता त्यांच्या शेतात तीन तर काही लांडोर जवळच्या शिवारात पडले होते. ही माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळ गाठले. दरम्यान एक लांडोर अत्यवस्थ स्थितीत आढळला. त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, तहसीलदार बळवंत अरखराव यांच्यासह महसूल व वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. लांडोरांचा मृत्यू नेमका कुठल्या कारणाने झाला हे वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होईल.