हॉस्पिटलला आग, खिडक्‍या तोडून 35 बालकांना काढले

0
12

ग्वाल्हेर- मध्‍यप्रदेशातील मोरेना या शासकीय जिल्‍हा रुग्‍णालयात स्पेशल न्यूलीबोर्न केयर यूनिट (SNCU) या हॉस्‍पिटलला आग लागली. रविवार दुपारी एयरकंडीशनर फुटल्‍यामुळे ही दुर्घटना घडली आहे. आग लागल्‍यानंतर घटनास्‍थळावर उपस्‍थित स्‍टाफने तत्‍काळ 35 नवजात बालकांना खिडक्‍या तोडून बाहेर काढले आहे. काही वेळानंतर आग आटोक्‍यात आली.या ब्लास्टमुळे पूर्ण युनिटमध्‍ये आग लागली.तेव्‍हा युनिटमध्‍ये 35 मुलं दाखल होते. यूनिटमधील डॉ. विकास शर्मा आणि परिचारिकांनी तत्‍काळ सर्व मुलांना बाहेर काढले. मुलांना बाहेर काढण्‍यासाठी वार्डच्‍या खिडक्‍या तोडण्‍यात आल्‍या.