‘आदिम’चे आरक्षणासाठी आंदोलन

0
9

नागपूर ,दि.6- आदिम संविधान संरक्षण समितीच्या वतीने आज सोमवारला येथील संविधान चौकात आरक्षणाच्या मागणीकरिता  आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन समितिच्या अध्यक्षा एड. नंदा पराते यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी  नंदा पराते यांनी सांगितले की, आदिवासी समाज भारताचा मूळनिवासी समाज आहे. तरी देखील यांच्या मध्येच सामील असलेल्या हलबा समाजाला आरक्षणातुन वगळण्यात आले आहे. सोबतच या समाजाचे जात प्रमाणपत्राचे अर्ज देखील स्वीकारण्यास मनाई केली जात आहे. nagpur Aadimजो सर्व परी भारतीय संविधानाचा अपमान आहे. त्यामुळे हलबा समाज विकासाच्या दृष्टीने अधिक मागे पड़त आहे. नंदा पराते यांनी सांगितले की, मागील ४० वर्षांपासून समाज या मागणीला घेऊन आंदोलन करत आहे. मात्र, त्याच्यावर कुठलाही तोडगा काढला जात नाही, कांग्रेस सरकारच्या वेळी भाजप ने त्यांची सरकार येताच हा प्रश्न मार्गी लावण्याचं वचन दिलं होत. मात्र, राज्यात आणि केंद्रात आपली सरकार बसवून ही भाजपा या मागनीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही केला.