पहिल्‍या स्‍वदेशी प्रशिक्षक विमानाची चाचणी यशस्‍वी

0
8

वृत्तसंस्था
बंगळुरु,दि.17 – हिन्दुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) तयार केलेल्‍या संपूर्ण भारतीय बनावटीच्‍या पहिल्‍या मुलभूत प्रशिक्षक विमानाची (HTT-40) चाचणी आज शुक्रवारी यशस्‍वी पार पडली. या विमानाचा तीनही सैन्‍य दल वापर करणार आहेत. चाचणीच्‍या वेळी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर हे या विमानाच्‍या कॉकपिटमध्‍ये बसले होते. ते म्‍हणाले, ‘हे मेक इन इंडियाचे यश आहे…’
चाचणीपूर्वी संरक्षणमंत्र्यांनी या विमानाच्‍या कॉकपिटमध्‍ये बसून संपुर्ण माहिती घेतली.त्यानंतर ट्वीट करून याला मेक इन इंडियाचे यश म्‍हटले.
> HTT-40 चा पहिला नमुना याच वर्षी जानेवारीमध्‍ये समोर आला होता.
> 2018 पर्यंत त्‍याला अधिकृतपणे मंजुरी मिळेल.
> दोन आसनी हे विमान एयरफोर्सच्‍या पायलट्सला प्रशिक्षण घेण्‍यास उपयुक्‍त ठरणार आहे.
> भारताला या प्रकारच्‍या 200 विमानांची गरज आहे.वायू दल देणार 70 विमानांची ऑर्डर
> यापूर्वी 31 मे रोजीसुद्धा एचटीटी-40 ची चाचणी घेण्‍यात आली होती.
> सूत्रांच्‍या माहितीनुसार, एयरफोर्स आपल्‍या 70 टर्बो ट्रेनर्ससाठी या विमानांची ऑर्डर देऊ शकतो.
> 30 मिनिट उड्डाण करण्‍याची या विमानाची क्षमता आहे.
> यापूर्वी HAL ने लाइट कॉम्बेट एयरक्राफ्ट ‘तेजस’ची निर्मितीसुद्धा केली होती.