रतनारा येथे होणार ४५०० वृक्ष लागवड

0
11

गोंदिया,दि.१८ : येत्या १ जुलै रोजी २ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत गोंदिया तालुक्यातील रतनारा येथे सामाजिक वनीकरण विभाग व गोंदिया पब्लीक स्कूल यांच्या संयुक्त वतीने ग्रामस्थांच्या सहकार्यातून ४५०० विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. रतनारा येथे नुकतीच सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी युवराज कुंभलकर व गोंदिया पब्लीक स्कूलच्या हरित सेना प्रभारी वर्षा भांडारकर यांनी नुकतीच गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या संवादातून त्यांनी वृक्ष लागवडीचे महत्व उपस्थित ग्रामस्थांना पटवून दिले. या कार्यक्रमात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, व गावपातळीवर काम करणाऱ्या विविध यंत्रणेचे कर्मचारीसुध्दा १ जुलैच्या वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
गावात कोणकोणत्या ठिकाणी वृक्ष लागवड करावयाची आहे. हे स्थळ निश्चित केले असून रोपटे लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम ग्रामस्थ वेगाने करीत आहे. गावाच्या विकासासोबत स्वच्छता अभियान, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मुलन तसेच विधायक उपक्रम गावात राबविण्याचा संकल्प सामाजिक वनीकरण विभाग व गोंदिया पब्लीक स्कूल यांनी केला आहे. ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या सभेत ग्रामस्थांना ‘एक घर एक वृक्षङ्क या उपक्रमांतर्गत उपस्थित ग्रामस्थांना यासाठी रोपटे भेट देण्यात आले. वृक्ष लागवडीबाबतच्या सभेला अविनाश गोंदोळे, गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री.लिल्हारे यांचेसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.