मुसळधार पाऊस व भूस्खलनामुळे 30 जणांचा मृत्यू

0
11

वृत्तसंस्था
देहराडून,दि.01- उत्तराखंड राज्यातील चमोली व पिथौरागड भागात आज झालेल्या ढगफुटीमुळे 30 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जखमी झाले आहेत. गेल्या 24 तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अलकनंदा, सरयू व मंदाकिनीसह राज्यातील 10 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. चमोलीत दोन चिमुरडे नदीच्या पुरात वाहून गेल्याचे वृत्त आहे.

काही भागात भूस्खलन झाल्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर दरडी कोसळल्या आहेत. परिणामी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पूरगस्त भागात प्रसासनाकडून बचावकार्याला सुरुवात झाली आहे.नौलाडा भागात भूस्खलनामुळे एकाच कुटुंबातील तीन जणांचा ढिगार्‍याखाली दबून मृत्यू झाला आहे.टोपराधार दाफिलामध्ये दोन घरे कोसळल्याने तीन जनावरे ढिगार्‍याखाली ठार झाली आहेत.धारचुला भागात तीन व जौलजीबीमध्ये दोन पुल वाढून गेले आहेत.तर देहराडूनसह एकून 8 जिल्ह्यात रविवारपर्यंत मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.