जि.प.प्रशासकीय अावारासह विविध ठिकाणी वृक्षारोपण

0
12

गोंदिया,दि.१ : जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणाच्या असमतोलामुळे पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखणे ही आज काळाची गरज झाली आहे. हीच गरज ओळखून राज्य शासनाने आज १ जुलै रोजी राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला. या वृक्ष लागवड मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय ईमारत परिसरात 100 विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करुन अधिकारी,पदाधिकारी व कर्मचारी यांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासली.
त्य़ाआधी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कार्यक्रम घेऊन वृक्षलागवडीची माहिती देण्यात आली.त्यानंतर प्रशासकीय भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सीईओ डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार,जि.प.अध्यक्ष उषा मेंढे,जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे,कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे,समाजकल्याण सभापती देवराज वडगाये यांच्यासह कार्यकारी अभियंता गोपाल शर्मा,उपविभागीय अभियंता श्री मानकर,पशुसवर्धन अधिकारी डाॅ.एच.एस.चव्हाण,कृषी विकास अधिकारी कु.वंदना शिंदे,श्री.निमजे, तिलक पटले, विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे,सुभाष खत्री,यांच्यासह लघु पाटबंधारे विभाग,शिक्षण विभाग,आरोग्य विभाग व बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
2
गोंदिया येथील गुजराती शाळेच्या विद्यार्थ्यांनीही शाळेच्या परिसरात वृक्षारोपन केले.फुलचूरपेठ येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद सदस्या सिमा मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामेश्वर दहिकर,हरीभाऊ पालादुरंकर यांच्यासह मुख्याध्यापक,शिक्षक व नागरिकांच्या उपस्थिती वृक्षारोपण करण्यात आले.नंगपुरा मुरी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका शिवानी लदरे यांच्या उपस्थितीत सर्व शिक्षक व ग्रामवासींच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले.देवरी तालुक्याती डवकी येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेचेवतीनेही वृक्षारोपण करण्यात आले.संचालक महेंद्र वैद्य यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
येथील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात प्रभारी उपविभागीय अभियंता श्री निमजे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी अभियंता दमाहे,श्री खापर्डे यांच्यासह इतर कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.पंचायत समिती आमगाव येथेही वृक्षारोपण करण्यात आले.गोरेगाव तालुक्यातील गोंदेखारी येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग गोंदियाच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.माजी सभापती मोरेश्वर कटरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पचायत समिती सदस्य पुष्पराज जनबंधु,शाखा अभियंता प्रदिप रहंगाडाले,सरपंच व नागरिक उपस्थित होते
गोंदिया शहरातील प्रभाग 6 मध्ये नगरसेविका भावना कदम यांनी इंजिन शेड शाळेतील मुलांना वृक्षारोपणाचे महत्व सांगितले.यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.त्याप्रसगी श्रीमती ठाकुर व श्रीमती कुरेशी शिक्षिका उपस्थित होत्या.जि.प. उच्च प्राथ शाळा बेरडीपार /खु. शाळेत जि.प.सदस्य साै. रजनीताई कुंभरे,प.स.सदस्य रमनिकजी सयाम यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
2,गोंदिया पिंडकेपार येथील कलार समाज सांस्कृतिक सभागृह परिसरात समाज संघटनेचे अध्यक्ष मनिष चौरागडे ,पूर्व अध्य्क्ष रामनारायण भोयर ,चक्रधर कावड़े, उपाध्यक्ष नीलकंठ सिरसट,धर्मेन्द्र धापदे,सचिव शरद डोहदे.कोषाध्यक्ष नारायण कावड़े,राजू धुवारे,राजेंद्र कावड़े.,मनोज डोहदे,चमन बिसेन,रिंकू भोयर,यशवंत कावड़े,गोपाल बिजेवार,महादेव चौरे,माधव भोयर ,टीकाराम बिजेवार नीता धपडेयांच्या हस्ते उपाध्यक्ष निलकंठ शिरसाठे,पत्रकार संजय राऊत आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.