केजरीवालांच्‍या प्रधान सचिवांसह 5 अटक

0
5

नवी दिल्ली- सीबीआयने सोमवारी केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्रकुमार यांच्‍यासह 5 जणांना अटक केली आहे. या लोकांवर 50 कोटी रुपयांचा भ्रष्‍टाचार केल्‍याचा आरोप आहे. सीबीआयच्‍या माहितीनुसार, राजेंद्र यांनी आपल्‍या पदाचा दुरूपयोग कर एंडेवर नावाच्‍या खाजगी कंपनीचा फायदा करुन दिला आहे. अटक केलेल्‍या लोकांमध्‍ये सीएम ऑफिसचे उपसचिव तरुण शर्मा, एंडेवर कंपनीचे दोन अधिकारी आणखी एकाचा सहभाग आहे. भ्रष्‍टाचार आणि पदाचा दुरूपयोग केल्‍याचा आरोप आहे.सीबीआयच्‍या माहितीनुसार, अटक केलेले सर्व लोक तपासात मदत करत नाहीत.राजेंद्रकुमार आणि तरुण शर्मासह एंडेवर कंपनीचे दोन अधिकारी ताब्‍यात घेतले.संदीपकुमार, दिनेश गुप्ता आणि एक अन्‍य एका प्रायव्‍हेट कंपनीचे निर्देशक अशोककुमार यांना अटक करण्‍यात आली आहे.सीबीआयचा दावा आहे की, राजेंद्रकुमारने या लोकांना सहकार्य करून एंडेवर नावाच्‍या कंपनीला अधिक लाभ मिळवून दिला.राजेंद्रकुमार तेच ऑफिसर आहेत, ज्‍यांना 2013 मध्ये केजरीवाल यांनी आपल्‍या 49 दिवसांपूर्वीच्‍या टर्मसाठी प्रधान सचिव बनवले होते.