नागपूरमध्ये आईनेच केला गर्भवती मुलीचा खून

0
13

नागपूर, दि.१६ – प्रेम संबंधातून गर्भवती झालेल्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्येचा कांगावा करणा-या आईला पोलिसांनी अटक केली.तिने शुक्रवारी रात्री अंकिताच्या खुनाची कबुली दिली वाडी येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.
मुक्ताबाई समाधान मेश्राम (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. तिची मुलगी अंकिता हिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्या तरुणाशी शरिरसंबंध प्रस्थापित झाल्याने तिला गर्भधारणा झाली. मुक्ताबाईला हे माहित पडल्याने तिने अंकिताला त्याबाबत विचारले असता अंकिताने उडवाउडवीची उत्तरे दिली. बदनामीच्या धाकापोटी मुक्ताबाईने तिला गर्भपात करण्याची विनंती केली.मात्र अंकिताने त्याला विरोध केल्याने १३ जुलैच्या मध्यरात्री दोघीत कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात मुक्ताबाईने अंकिताचा गळा आवळून खून केला.