प्रधानमंत्री मोदी हे नकली ओबीसी-माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील

0
8

ओबीसी अदिवेशन नागपूरपाच हजारावर ओबीसींनी लावली हजेरी
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाअधिवेशन धडाक्यात

नागपूर,दि.8 -देशातील मुलनिवासी असलेला ओबीसी बहुजन समाजाच्या विकासाला आडकाठी निर्माण करुन राज्यघटनेने दिलेले सवैंधानिक अधिकारापासून वंचित ठेवणारे देशातील विविध राजकीय पक्ष हे बहुजन विरोधी अाहेत.दलित,ओबीसी,आदिवासी आम्ही सर्व एक असून आमचा डीएनए एक असल्यानेच या सर्वांनीच मंडल च्या लढाईत सहभागी व्हायला हवे.आज जे ओबीसींच्या नावावर देशाच्या प्रधानमंत्री पदावर विराजमान झाले.ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उच्चवर्णीय असून गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपली जात ओबीसीमध्ये समाविष्ठ करुन घेतली.असे हे मोदी नकली ओबीसी आहेत अशी परखड टिका माजी न्यायमूर्ती बी.डी.कोळसे पाटील यांनी केली.ते येथील धनवटे नॅशनल काॅलेजच्या भाऊसाहेब डाॅ.पंजाबराव देशमुख सभागृहात रविवारला आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाधिवेशनाचे उदघाटक म्हणून बोलत होते.
स्वागताध्यक्षपदी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे हे होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत व बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी होते. अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर,माजी राज्यमंत्री व विधानसभेचे गटनेते आमदार विजय वड्डेटीवार,खासदार नाना पटोले,आमदार आशिष देशमुख,आमदार नागो गाणार,माजी आमदार सुधाकर गणगणे, पांडुरंग ढोले,सेवक वाघाये,सुदर्शन निमकर,सुशीलाताई मोराळे,माजी आमदार यादवराव देवगडे, प्रा.जेमिनी कडू,बबनराव फंड,प्रा.मा.म.देशमुख, भंडारा जि.प.अध्यक्ष सौ.भाग्यश्री गिल्लोरकर आदी मान्यवर मंचावर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते
पुढे बोलतांना कोळसे पाटील म्हणाले की,परिवर्तनाच्या लढाईत विरोध पत्करण्याची सवय असलेल्यानींच सहभागी व्हावे,ज्यांची विरोध पत्करण्याची क्षमता नाही,त्यांनी समोर येण्यापेक्षा परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्याला पाठिंबा द्यावा.यासाठी स्वतंत्र विचारांची पिढी निर्माण करण्याची गरज असून आरएसएसच्या जोखड्यातून आपल्या ओबीसी युवकांना मुक्त करुन आरएसएस मुक्त भारत ही संकल्पना सुध्दा आपल्या चळवळीतील लोकांच्या मनात रुजली पाहिजे असे परखड मत त्यांनी यावेळी मांडले.महात्मा फुल्यांनी महिलांसह सर्वांना शिक्षणाची दारे उघडी करुन दिली परंतु आज ज्याला आपले सरकार डोक्यावर घेत आहे,त्या लोकमान्य टिळकांनीच महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता याचाही विचार आपण केला पाहिजे.जेव्हा जेव्हा ओबीसी समाजाबद्दल जनजागृतीचे आंदोलन किंवा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा या देशातील मनुवादी वर्णव्यवस्थेने देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.बाबरी मंदिर पाडल्यानंतर देशात अशातंता जी नांदत आहे आणि ज्या काही 90 टक्के दंगली घडल्या आरएसएसने प्रायोजित होत्या.1984 शिख दंगलातील 50 टक्के आरोपी हे आरएसएसचे असल्याचा दावा आपण माजी न्यायमुर्ती म्हणून करीत असल्याचेही ते सांगत याबाबतचे पुरावेही कुणाला हवे असल्यास दाखविण्याची तयारी त्यांनी यावेळी दाखवली.आम्ही या देशातील मुलनिवासी असून आम्हाला राज्यघटनेच्या कलम 21 नुसार माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे,त्या अधिकाराची जाणिव न झाल्यानेच ओबीसीसमाज गुलामगिरीविरुधद् बंड करु शकला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.कुठलाही राजकारणी व्यक्ती हा प्रश्न सोडविण्यापेक्षा चिघळवण्याचा अधिक प्रयत्न करतो,त्यामुळे आपण चळवळीतील माणसांनाही सावध राहून काम करण्याची गरज असल्याचे विचार मांडले.आपण ओबीसी पुरतेच मर्यादेत न राहता येथील दलित आदिवासीनाही सोबत घेऊन डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेतील प्रत्येक कलमाची काटेकोर अमलबजावणी कशी होईल या ध्यास असला पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी ओबीसी बहुजन समाजासाठी काम करणार्या मान्यवरांचा कृतज्ञता सत्कार करण्यात आला.यामध्ये बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी,इतिहासकार प्रा.मा.म.देशमुख,माजी आमदार सुधाकर गणगणे,बबनराव फंड यांना शाल,स्मृतिचन्ह व ग्रंथभेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात उदघाटक न्या.कोळसेपाटील यांच्याहाती मशाल सोपवून करण्यात आले.प्रास्तविकात सचिन राजुरकर यांनी मंडल दिनाच्या निमित्ताने ओबीसी समाजाला संघटित करण्यासाठी या महाधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी सवैधानिक अधिकाराची जाणिव मंडळ आयोगामूळे झाल्याचे स्पष्टकरीत दलीत आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधींना ज्याप्रमाणे आपल्या समाजाबद्दल अापुलकी असते आणि अधिकारासाठी बाजू मांडतात.परंतु ओबीसीचे लोकप्रतिनिधी हे निव्वळ माना डोलवित राहिल्यानेच ओबीसी समाजाचे प्रश्न आजपर्यंत कुठल्याही सरकारने प्राधान्यक्रम देऊन सोडविले नाही.त्यामुळे आपण या महाधिवेशनाच्या माध्यमातून सर्व ओबीसी लोकप्रतिनिधींना व चळवळीतील प्रमुखांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे विचार मांडले.IMG-20160807-WA0338
ओबीसींचा लढा हा आरक्षणाचा नव्हे तर मालकीचा आहे-नागेश चौधरी
ओबीसी महाधिवेशनाच्या उदघाटकीय सत्राचे अध्यक्ष नागेश चौधरी यांनी ओबीसींचे आंदोलन हे निव्वळ आरक्षणाचा लाभ मिळेपर्यंत कायम असू नये तर ते सवैधानिक अधिकार प्राप्त करुन आपल्या मालकीचा लढा आहे हा विचार पक्का केला पाहिजे असे सांगितले.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व शोषित समाजासाठी लढा दिला.परंतु आजही आपला ओबीसी समाज बाबासाहेबांचे विचार स्विकारु न शकल्यानेच अधोगतीकडे चालला आहे.ज्या महात्मा फुल्यांनी इंग्रजाकडे सर्वासांठी शिक्षणाचा अधिकार मागितला.त्या फुल्यामूळेच आज आपला समाज शिक्षणाचा प्रवाहात कुठेतरी दिसून येत आहे.यासाठी आपल्या समाजाने सावरकर,टिळकांचे विचार एैकण्याएैवजी स्विकारण्याएैवजी फुले आंबेडकर शाहूंचे विचार स्विकारणे गरजेचे झाले आहे.म.फुल्यांनी त्या काळात गणपती नाकारला परंतु टिळकांनी तो सार्वजनिक केला आणि आम्ही आजही त्यात गुरफटले गेलो ही संस्कृती आपली नसून आपण सिंधू संस्कृतीचे मालक होतो हे लक्षात घेण्याची वेळ असल्याचे चौधरी म्हणाले.ब्राम्हणांचा धर्म हा सनातन नसून त्यांच्या स्वार्थ सनातन असून जात पाळणे ही विकृती आहे.हिंदु धर्म नाही संस्कृती आहे याचा विचार शिक्षित ओबीसी समाजाने संशोधनात्मकरित्या अभ्यास करुन करणे गरजेचे असल्याचेही म्हणाले.संचालन प्रा.कोमल ठाकरे यांनी केले.आभार एन.जी.राऊत यांनी मानले.
आयोजनाच्या यशस्वीतेसाठी निमंत्रक सचिन राजुरकर,प्रा.शेषराव येलेकर,शरद वानखेडे,एन.जी.राऊत,गुणेश्वर आरीकर,खेमेंद्र कटरे,मनोज चव्हाण,गोपाल सेलोकर,निकेश पिणे,विनोद उलीपवार,सुषमा भड,डी.डी.पटले,विजयराव तपाडकर,कृष्णा देवारे,संजय भिलकर,भुषण दडवे,नाना लोखंडे,गोविंद वरवाडे,पांडुरगं काकडे,श्रावण फरकाडे,यशश्री देशमुख, संदीप गुलवे,रिकेश म्हात्रे,महेश गुबे,जगदिश महले,भावेश नलावडे,नागेश धामनकर,सचिन चंद्रे,अक्षय जाधव,तुषार कोल्हे,श्याम गायकवाड,तुषार गिर्हे,धनयु कडुले,किरण पवा,दिगबंर अवचट,अकुंल कदम,अंकिता मोहोड,सृष्टी कोलते,नेहा मिरगे,भाग्यक्षी बर्वे,अक्षता खर्चे ,निलेश कोढे, उज्वला महल्ले, शुभेच्छा तिडके , शामल चन्ने, श्रुतिका राजूरकर, विनोद हजारे, अतुल धोटे शुभम चौधरी, पूजा शाहु, भूषण उके, विनोद हजारे , अतुल धोटे, शुभम चौधरी, पूजा शाहु, आणि रोशन कुंभलकर या सर्वांनी सहकार्य केले.