ओबीसींनी मनुवाद्यांच्या जातव्यवस्थेला तोडावे-अॅड.हलकारे

0
18

नागपूर,दि.8-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने आयोजित ओबीसी महाधिवेशनाच्या व्दितीय सत्रातील ओबीसी शिष्यवृत्ती व नाॅन क्रिमिलेयर समस्या आणि एकविसाव्या शतकातील ओबीसी युवकासमोरील आव्हाने या विषयावरील परिसवंदात अॅड.गणेश हलकारे यांनी आम्ही आजही व्यवस्थेचे गुलाम आहोत.ही गुलामाची मानसिकता सोडायची असेल तर आपल्यात जातपात वर्ण व्यवस्थेला थारा राहता कामा नये असे विचार व्यक्त केले.हलकारे म्हणाले की,मंडल आयोग लागू झाला तेव्हा आमच्याच ओबीसी समाजातील लोकांनी विरोध करुन आपल्या पायावर धोंडा मारुन घेतला.त्याचे वाईट परिणाम आज आपणास भोगावे लागत आहेत.कुठलीही सत्यता जाणून न घेता ब्राम्हणवाद्यांच्या सांगितल्याप्रमाणे वागलो आणि स्वतःच्या सवैधानिक अधिकारापासून स्वतःलाच वंचित ठेवले.आम्ही सिंधु संस्कृतीचे रक्षकच नव्हे तर पालनकर्ते आहोत याचा विसर पडल्यानेच आम्ही आपल्या बळीराज्याला विसरलो आणि मनुवाद्यांनी पेरलेल्या नकली देवीदेवतांच्या मागू धावून आपली आर्थिक स्थिती हलाखीची करुन बसल्याची टिका ही त्यांनी केली.
या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.जेमिनी कडू होते.तर प्रमुख वक्ते म्हणुन अॅड.गणेश हलकारे,प्रा.शेषराव येलेकर यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवी राणा,आमदार सुनिल केदार,प्राचार्य आर.जी.टाले,प्रा.दिवाकर गमे,प्रा.अरुण पवार,रविकांत बोपचे,नितिन मते,दिनेश चोखमारे,डाॅ.राजेश ठाकरे,भुषण दडवे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलतांना प्रा.शेषराव येलेकर यांनी नाॅनक्रिमिलेयर ही अट आपल्यावर न्यायालयाच्या माध्यमातून असैवधानिकरित्या लादण्यात आली अाहे.राज्यघटनेत कुठेही ओबीसींना आरक्षण देतांना क्रिमिलेयर लावण्यासंबधीच नव्हे तर मंडल आयोगात सुध्दा त्याचा उल्लेख नसताना ओबीसीच्या विद्यार्थ्यांना उच्चपदावर पोचण्यापासून रोखण्यासाठी न्यायालयातील मनुवादी वर्णव्यवस्थेने आमच्यावर लादलेली ही अट कायमचीच रद्द करण्यासाठी लढा देण्याची गरज आज निर्माण झाल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले.सोबतच क्रिमिलेयर देतांना वेतनावर नव्हे तर त्या व्यक्तीच्या पदावर अवलंबून असते असेही सांगितले.

ओबीसीच्या हितासाठी हीच संघर्षाची खरी वेळ-आ.रवी राणा
या ओबीसी महाधिवेशनाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला जोडण्याची प्रकिया सुरु झाली आहे.जातपातीच्या राजकारणात आपण ओबीसी आहोत हे काही लोकांच्या षडयंत्रामुळे विसरुन गेलो आणि त्यााचाच लाभ घेत उच्चवर्णीयांनी आमच्या युवकांच्या नोकरीसह शिक्षणातील अधिकार हिरावून घेतले.गेल्या 60-65 वर्षापासून सातत्याने ओबीसीवर अन्याय होत आला असून गेल्या दोन तिन वर्षात यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे,त्यामुळे अोबीसी समाजाला संघर्षाशिवाय पर्याय उरलेला नाही.आमच्या मतावर आणि भऱोश्यावर असलेले सरकारच आमच्या विरोधात जात असेल तर गप्प बसून काही होणार नाही,तर लढा देण्याची वेळ आली आहे.आजही आमचा ओबीसी शेतकरी,शेतमजुर आत्महत्या करतोय कर्जाच्या खाईत लोटला आहे त्याला कुठल्याही सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या गेल्या नाहीत.त्यामुळे पुर्ण ताकदिने आणि तळमळीने या हक्काच्या लढ्यासाठी मैदानात उतरण्याची वेळ आल्याचे विचार बडनेराचे आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले.

यापुढे कुटुंबातील इतर सदस्यांना जात पडताळणीची गरज नाही- ना. बावणकुळे
नोकरी, शिक्षण तसेच सार्वत्रिक निवडणुक लढवायची असल्यास मागास जातीतील नागरिकांना आपल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी ही जात पडताळणी समिती कडून आवश्यक आहे. यासाठी मागासवर्गीय समाजातील लोकांनी खुप मानसिक व आर्थिक ताण सहन करावा लागतो. कधीकधी तर वेळेवर पडताडणी झाली नाही, तर अशा कुटुंबाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व समस्या विचारात घेत राज्य शासनाने जात पडताडणीच्या पद्धतीत सुधारणा करण्याचे ठरविले आहे. यापुढे कुटुंबातील एकाही सदस्याकडे जातवैधता प्रमाणपत्र असल्यास त्या कुटुंबातील इतर सदस्यांना जात पडताळणीची आवश्यकता राहणार नाही. याविषयी लवकरच शासनाचे परिपत्रक येणार असल्याची घोषणा राज्याचे उर्जामंत्री ना. चंद्रशेखऱ बावणकुळे यांनी ओबीसी महाधिवेशनात केली.तसेच 6 लाख उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय सुध्दा मंगळवारच्या कॅबीनेटनंतर लगेच निघणार असून मी स्वत तो निर्णय ओबीसी महासंघाकडे देणार असल्याचे सांगितले.
आमदार सुनिल केदार यांनी सरकार ओबीसींच्या पाठीशी असून आजपर्यंतच्या सरकारने सुध्दा सातत्याने अन्याय केला आहे.परंतु विद्यमान सरकार हे ओबीसीच्या हिताचे निर्णय घेत असून या सरकारनेही ओबीसी विरोधी भूमिका घेतली तर आपण ओबीसी महासंघासोबत आंदोलनात उतरु अशी ग्वाही दिली.
या सत्राच्या अध्यक्षीय भाषणात प्रा.जेमीनी कडू यांनी आम्ही मूळ भारतीय असून भटब्राम्हण हे विदेशी असल्याचे सांगत राजकारणी नेत्यानी आजपर्यंत ओबीसी समाजाचा सत्तेसाठी गैरवापरच केला आहे.आता आपल्या युवकांनी सजग होऊन ओबीसी समाजाचा राजकारणासाठी होणारा गैरवापरही टाळणे काळाची गरज असून दलित मुस्लीम आणि इतर समाजासोबत आपले संबध हे घनिष्ट असणे आवश्यक आहे कारण आपण एकच आहोत हे विसरुन चालता येणार नसल्याचे सांगितले.