ओबीसी महाधिवेशनानिमित्त विद्यार्थांची मोटारसायकल रॅली

0
7

नागपूर,दि.8– राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने रविवार(दि.7) मंडल आयोग लागू होण्याच्या निमित्ताने आयोजित ओबीसी महाधिवेशनाच्या सुरवातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विद्यार्थी संघटनेच्यावतीने काॅटन मार्केटस्थित महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेला मानवंदना व माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर मशाल प्रज्वलीत करुन ती मशाल युवा समिती प्रमुख मनोज चव्हाण व विद्यार्थी संघटनेचे प्रमुख निकेश पिणे यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी वैद्यकिय महाविद्यालय(मेयो)च्या विद्यार्थी विद्यार्थिनींसह मोटारसायॅकल रॅली काढून अधिवेशऩस्थळी आणण्यात आली.यावेळी ओबीसी समाजाला जागृत करण्यार्या घोषणा देत फलक हातात घेऊन ओबीसी विद्यार्थीनी परिसर ओबीसीमय करुन टाकला होता. IMG-20160808-WA0026
या मोटारसायकल रॅलीमध्ये संदीप गुलवे,रिकेश म्हात्रे,महेश गुबे,जगदिश महले,भावेश नलावडे,नागेश धामनकर,सचिन चंद्रे,अक्षय जाधव,तुषार कोल्हे,श्याम गायकवाड,तुषार गिर्हे,धनयु कडुले,किरण पवा,दिगबंर अवचट,अकुंल कदम,अंकिता मोहोड,सृष्टी कोलते,नेहा मिरगे,भाग्यक्षी बर्वे,अक्षता खर्चे,निलेश कोढे, उज्वला महल्ले, शुभेच्छा तिडके , शामल चन्ने, श्रुतिका राजूरकर, विनोद ओके,विनोद हजारे , अतुल धोटे शुभम चौधरी,पूजा शाहु,भूषण उके,धनवटे नॅशनल काँलेजचे विनोद हजारे ,रोशन आणि, अतुल धोटे, शुभम चौधरी,निलेश कोढे, उज्वला महल्ले, शुभेच्छा तिडके , शामल चन्ने, श्रुतिका राजूरकर, विनोद , पूजा शाहु, रोशन कुंभलकर या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.