राज्यातील “झेडपीं’मध्ये आज काम बंद आंदोलन

0
10

गोंदिया,दि.11 – औरगांबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार सुरेश बेदमुथा यांना जिल्हा परिषद सदस्य संभाजी डोणगावकर यांनी केलेल्या शिवीगाळ, मारहाणीचे औरंगाबाद जिल्हा परिषदेसह राज्यभरातील जिल्हा परिषद, पंचायत समितींमध्ये तीव्र पडसाद उमटले. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (ता.11) राज्यातील सर्व जिल्हा परिषदांत काम बंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार ग.दी.कुलथे,अध्यक्ष इंजि.मनोहर पोकळे व सरचिटणीस समिर भाटकळ यांनी मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे.
आहे. त्याबाबतचे निवेदन राजपत्रित अधिकारी महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांना देण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद, सर्व नऊ पंचायत समित्यांमधील काम बंद आंदोलनामुळे बुदवारी दिवसभर कामकाज ठप्प झाले होते.आज या घटनेचा निषेध राज्यव्यापीस्तरावर आंदोलन करुन नोंदविण्यात येणार आहे.