चलनातून 500 आणि 1000च्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द

0
8

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. आज मध्य रात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्यातआल्या आहे. यापुढे ही दोन्ही नोटा चलनातून बंद झाल्या आहेत.आज मध्यरात्रीपासून, म्हणजेच ८ नोव्हेंबरच्या १२ वाजल्यापासून ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या आहेत. तशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. या निर्णयामुळे आज मध्यरात्रीनंतर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांची किंमत केवळ कागदाचा तुकडा म्हणून राहणार आहे.ज्यांच्याकडे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा असतील, त्यांनी १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या आपल्या खात्यात जमा कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी नागरिकांनाकेले आहे.