गाडगेबाबांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

0
11

गोंदिया दि.९-स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथून संत गाडगेबाबांची पालखी गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी (दि.८) दुपारी ४ वाजता दाखल झाली. जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी पालखीचे स्वागत केले.
गडचिरोली जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.के. माळी, गडचिरोली जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक अनिम माणुसमारे, अभियंता रोशन चकोले, अमित फुंडे, शालेय स्वच्छता तज्ञ शैलेश ढवस, सहायक गटविकास अधिकारी मरस्कोल्हे, विस्तार अधिकारी उमेशचंद्र चिलबुले यांनी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे गोंदिया जिल्ह्यात मार्गक्रमणासाठी पालखी स्वाधीन केली. यावेळी अर्जुनी मोरगावचे सहायक गटविकास अधिकारी मयुर आदेलवाडे, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी राजू वलथरे, विस्तार अधिकारी अनूप भावे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे स्वच्छता तज्ञ सूर्यकांत रहमतकर, माहिती शिक्षण व संवाद तज्ञ राजेश उखळकर, क्षमता बांधणी तज्ञ देवानंद बोपचे यावेळी उपस्थित होते. स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ऑक्टोबरपासून ही पालखी काढण्यात आली आहे.
स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांनी ज्या गाडीतून गावोगावी जावून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व विशद केले. त्या गाडीचे पालखीत रुपांतर करण्यात आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही पालखी मार्गक्रमण करुन स्वच्छतेबाबत जनजागृती करीत आहे. दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गौरनगर ग्रामपंचायतीेला सर्वप्रथम पालखीचे आगमन झाले. तालुक्यातील अरुणनगर, कोरंभी, खामखुरा, तावशी (खुर्द) येरंडी देवल, बाराभाटी, कुंभीटोला, नवेगावबांध, परसोडी रयत या ग्रामपंचायतील भेट दिल्यानंतर आज (दि.९) सडक अर्जुनी तालुक्यातील खोबा, कोकणा, जमी, कनेरी, राम, कोहमारा, सडक अर्जुनी, डव्वा, पळसगावल गोरेगाव तालुक्यातील मुरदोली, मुंडीपार, गोरेगाव, भडंगा, हिरडामाली, तुमखेडा, गोंदिया तालुक्यातील कारंजा, फुलचूरटोला, फुलचूर, गोंदिया, कुडवा, मुंडीपार, डोंगरगाव, एकोडी, तिरोडा तालुक्यातील काचेवानी व खैरबोडी येथे पोहोचल्यानंतर तिरोडा येथे पालखीचा मुक्काम राहील.