33.1 C
Gondiā
Monday, July 13, 2026
Home Top News भूमध्य सागरात बोट उलटून 180 निर्वासित बेपत्ता

भूमध्य सागरात बोट उलटून 180 निर्वासित बेपत्ता

0
23

रोम, दि. 17 – भूमध्य सागरात निर्वासितांना घेऊन जाणारी बोट शनिवारी (दि.14) उलटल्यामुळे जवळपास 180 जण बेपत्ता झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने मंगळवारी दिली आहे.
लिबियातून 180 हून अधिक निर्वासितांना घेऊन जाणारी बोट शनिवारी उलटली. या बोटीतील 180 जण बेपत्ता झाले असून चार जणांचा मृत्यू झाला, असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय निर्वासित संघटना आणि संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सीने याच बोटीच्या आपत्तीपासून वाचलेल्या चौघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिली आहे.