आदिवासी गोवारी महिलांचा हळदी-कुंकू रविवार 22 जानेवारीला

0
17

गोंदियादि. 17 – आदिवासी गोवारी महिला संघटन र.नं.268-89 शाखा गोंदिया च्या वतीने 22 जानेवारी 2017 रविवारला हळदी-कुंकू च्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. हळदी-कुंकू कार्यक्रमाचे स्थळ-खिल्यामुठा देवस्थान,गायगोधन परिसर,नगर परिषद हिंदी प्रायमरी शाळा,मरारटोलीच्या प्रांगणात होणार आहे. हळदी-कुंकू कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आदिवासी गोवारी समाजाच्या महिलांमध्ये सामाजिक जागृती व सामाजिक एकता निर्माण करणे हा आहे. सदर हळदी-कुंकू कार्यक्रमात लहान मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा आणि महिलांकरिता उखाणे स्पर्धा आयोजित केली आहे. सौ. छायाताई गजबे- भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली हळदी-कुंकू कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या उद्घाटिका हेमलता वाघाडे-आरमोरी-गडचिरोली यांच्या हस्ते उद्धाटन होईल. श्रीमती सविता पुराम यांच्या हस्ते दिपप्रज्वलन होणार असून प्रमुख उपस्थितीत शोभा चैधरी, नम्रता राउत, चंद्रकला वघारे, वैशाली राउत,नमिता शहारे, मिना शेंदरे, प्रमिला सोनवाने, सुलोचना कवरे, पुष्पा चैधरी, सुरेखा राउत,आम्रपाली चैधरी राहणार. सदर हळदी-कुंकू कार्यक्रमात मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान महिला जिल्हाध्यक्षा मधुमती नेवारे, सचिव व संयोजिका दमयंती नेवारे, शिला नेवारे, गिता शेंदरे, पौर्णिमा वघारे, तारा वाघाडे, शिला शहारे, सरोज कोहळे, गीता राउत, शालु कृपाले, कनकलता राउत, धनेश्वरी काळसर्पे ,लता शेंदरे, रेखा शहारे, मीना आंबेडारे, जयश्री फुन्ने, यमुना सोनवाने, कविता नेवारे, प्रमीला नेवारे, सिंधु आंबेडारे, पुष्पलता भोयर, लक्ष्मी आंबेडारे, शोभा राउत, कौशल्या आंबेडारे, मंदा बोपचे, उषा नेवारे, लता शहारे तसेच महिला संघटनेच्या इतर सभासदांनी केले आहे.