25.7 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home Top News बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला

बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला

0
34

चंद्रपूर berartimes.com दि.९-: नागभीड तालुक्यातील कोथुळणा शिवारात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. या बछड्याचे वय अंदाजे तीन ते चार महिन्याचे आहे. ही घटना बुधवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कोथुळणा शिवारात नीलकंठ दुधे यांचे शेत आहे. सध्या दुधे यांच्या शेतात लाखोळी वेचणीचे काम सुरू असून, दुधे यांचा नातू अरविंद बुधवारी सकाळी शेतात गेला होता. यावेळी त्याला शेतामध्ये बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र कार्यालयात येऊन वनाधिकार्‍यांना देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एम. तलांडे यांनी घटनास्थळ गाठून मोका पंचनामा केला व मृत बिबट्याचे शव उत्तरीय तपासणीसाठी नागभीड वनपरिक्षेत्र कार्यालयात पाठविले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीरामे यांनी शवविच्छेदन केले. सदर बछड्याचा पाठलाग करून एखाद्या प्राण्याने त्याच्यावर हल्ला करून ठार केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.