छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, वर्धा,भंडारा,चन्द्रपुर येथील जवानांसह १२ जवान शहीद

0
16

वृत्तसंस्था berartimes.com
रायपूर/सुकमा, दि. 11 – छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी शनिवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर (सीआरपीएफ) भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले आहेत. तर 5 जवान जखमी झाले. सुकमा जिल्ह्यातील भेज्जी परिसरातील ही घटना आहे.शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ तुकडीवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी सराव करत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याच्या बातमीला मुख्यमंत्री रमन सिंग यांनी देखील दुजोरा दिला आहे.
माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या सुकमा जिल्हयातील भेज्जीच्या जंगलात सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कोटाचेरू नावाच्या खेड्याजवळ ही घटना घडली. भेज्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे जंगल आहे. जंगलात जाणारा रस्ता सुरू करण्यासाठी CRPF च्या 219 बटालियनचे गस्त पथक गेले असताना जवानांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सुकमामधील CRPF जवानांच्या मृत्यूने दुःख झाले. हुतात्म्यांना आदरांजली व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी.””सुकमातील परिस्थितीविषयी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी मी बोललो. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते सुकमा येथे जाणार आहेत,” असे मोदी यांनी सांगितले.

सुकमाच्या भज्जी परिसरात सीआरपीएफ 219 बटालियनचे नक्षली हल्यात शहीद झालेले जवान
1.INS/GD -जगजीत सिंह- जिला- गुरदासपुर -पंजाब
2.HC/GD- पी.आर. मेले – जिला- वर्धा- महाराष्ट्र
3.ASI/GD- एच.वी भट्ट- जिला-नैनीताल- उत्तराखंड
4.ASI/GD- नरेन्द्र कुमार सिंह- जिला- दरभंगा- बिहार
5.CT/GD- सुरेश कुमार- जिला- कांगड़ा – हिमाचल प्रदेश
6.CT/GD-मंगेश बल पांडे-जिला भंडारा-महाराष्ट्र
7.CT/GD- नंदकुमार अतरम-जिला चन्द्रपुर-महाराष्ट्र
8.CT/GD- गोरखनाथ-जिला चंदौली-उत्तर प्रदेश
9. CT/GD-के.शंकर-जिला बिल्लूपुरम्, तमिलनाडु
10. CT/GD-रामपाल सिंह यादव=जिला कन्नौज, उत्तर प्रदेश
11.CT/GD- सतीश चन्द्र वर्मा-जिला प्रतापगढ़- उत्तर प्रदेश
12. HC/GD- जगदीश प्रसाद विश्नोई- राजस्थान