संतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी

0
12

नवी दिल्ली, दि. 23 – महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी लोकसभेत गुरुवारी करण्यात आली.
वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी लोकसभेत शून्यकाळादरम्यान केली. वसंतराव नाईक यांनी 1963 ते 1975 च्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. ते महान नेते होते. राज्यात रोजगार हमी योजना सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी अमलात आणला होता. तसेच, देशात राबविण्यात येणा-या मनरेगा सारख्या महत्वपूर्ण योजना राबविण्यामागे त्यांची मोठी कामगिरी होती. त्यामुळे त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या पुरस्काराने गौरविण्यात यावे आणि त्यांचा फोटो संसदेत लावण्यात यावा, अशी मागणी राजीव सातव यांनी यावेळी केली. याआधीही वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी काही संघटनानी केली होती.