अन्यथा मुंबईतून विमाने उडू देणार नाही- शिवेसनेचा इशारा

0
13

नवी दिल्ली दि. 6: एअर इंडियाच्या विमानांचे मुंबईतून उड्डाण होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या खासदारांनी आज (गुरुवार) मोदी सरकारला भर संसदेत दिला.भाजप खासदार एस.एस. अहलुवालिया आणि राजनाथसिंह यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सेना खासदारांनी आक्रमकपणे आपली बाजू लावून धरत भाजप नेत्यांना जेरीस आणले. त्यावेळी सेना खासदारांनी विमाने उडू देणार नाही असा इशारा दिल्याचे संसदेतील प्रक्षेपणादरम्यान ऐकू आले.केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी विमान प्रवासात तडजोड करणार नसल्याचे सांगताच सेना खासदारांनी त्यांना घेराव घातला.
या प्रकरणासंदर्भात गायकवाड यांनी लोकसभेत निवेदन केले. संसदेच्या प्रतिमेला तडा गेला असल्यास मी संसदेची माफी मागतो. मात्र, मी एअर इंडियाची अधिकाऱ्याची माफी मागणार नाही असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. खासदार गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी विरोधात लोकसभेत शिवसेनेचे खासदार आक्रमक झाले. त्यानंतर लोकसभेचे कामकाज 12.45 पर्यंत तहकूब करण्यात आले. आपल्यावरील बंदी उठविण्यात यावी, तसेच गुन्हा मागे घेण्यात यावा अशी विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षा सुनीता महाजन व केंद्रीय गृहमंत्री रजनाथसिंह यांच्याकडे केली.त्यावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी उत्तर देताना सांगितले की, विमान प्रवासात प्रवाशांची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची असून, त्यामध्ये तडजोड करणार नाही. हे प्रकरण मिटवायचे असेल तर आम्ही तसे करू शकतो. आणि ते वाढवायचे असेल तर तसेही करू शकतो असा इशारा त्यांनी दिला.