चांदसुरजच्या पहाडावर नक्षल्यांनी लपविलेले साहित्य जप्त 

0
32
गोंदिया,दि.19- जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाणेतर्गंत येणार्या चांदसुरज गावाच्या टॉवर लाईन पहाडीवर लपवून ठेवलेला नक्षक साहित्य जप्त करण्यात गोंदिया पोलिसाना यश आले असून सोबतच एका संशयीताला सुध्दा ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला सालेकसा पोलिसांनी दुजोरी दिला आहे.
 १० मार्च ला छत्तीसगढ राज्याच्या दंतेवाडा गावात झालेल्या नक्षली हल्यात महाराष्ट्रातील ६ जवानांचा दुर्देवी मृत्यू झाला असून .याच हल्ल्यात सहभागी असलेला वामन मडावी हा नक्षली घंटनेनंतर पळ काढत गोंदिया जिल्ह्यातील  रेस्ट झोनमध्ये दडून बसल्याची गुप्त माहिती देवरी पोलिसांना मिळाली.त्यानुसार देवरी पोलिसांनी कुख्यात नक्षली रमेश कोसा टेकाम उर्फ वामन कोसा मडावीला ताब्यात घेत तपास सुरु केले असता त्यांने सालेकसा तालुक्यांतर्गत येणाऱ्या चांदसुरज गावाच्या टॉवर लाईन पहाडीवर मोठ्या प्रमाणात नक्षली स्फोटके डम्प करून ठेवल्याची माहिती दिली.त्या आधारे बॉम्ब शोधक पथकाने शोध मोहीम राबवत टॉम नामक स्वानांच्या मदतीने पहाड क्षेत्रात पुरून ठेवलेले साहित्य हस्तगत केले.यामध्ये ३ किलो स्फोटक ,२ डिटोनेटर ,१ ब्याटरी ,लोखंडी खिडे ,२०० मीटर विद्युत तारेचा समावेश आहे.या प्रकरणात दरेकसा दलंम आणि तांडा दलम च्या २० महिला पुरुष नक्षलवाद्याविरुध्द सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे