मुरमाडीच्या ग्रामीण बँकेवर दिवसाढवळ्या दरोडा साडेसहा लाखाची रक्कम लंपास

0
14

गोंदिया,दि.16 (berartimes.com)-तिरोडा तालुक्यातील मुरमाडीच्या विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेवर आज मंगळवारला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाच अज्ञातबंदुकधारी व्यक्तींनी दरोडा घालून अंदाजे साडे सहा लाख रुपयाची रोख़ड लंपास केल्याची घटना घडली.पोलिस सुत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार तिरोडा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या तालुकामुख्यालयापासून 20 किलोमिटरवर मुरमाडी हे गाव आहे.येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीमध्ये विदर्भ कोंकण ग्रामीण बंकेची शाखा असून दररोजप्रमाणे आजही नियमित कामकाज सुरु हाेता.अचानक दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाच बंदुकधारी व्यक्तींनी बँकेत प्रवेश करुन त्यावेळी बँकेत हजर असलेल्या तीन ते चार ग्राहकांसह बँकेतील कर्मचारी व व्यवस्थापकांना दमदाटी करुन धमकावले.आणि कॅशियरकडे असलेली रक्कम व इतर अशी अंदाजे साडे सहा लाख रुपयाची रोखड घेऊन पसार होत असतानाच  बँकेतील काच बंदुकीने फोडले.काचफोडतेवेळी त्या बंदुकधारीपैकी एकाला लागल्याने त्याच्या हाताचे रक्त सुध्दा तिथे पडल्याचे सांगितले.यावेळी केलेल्या फायरींग मध्ये बँकेत असलेल्या एका ग्राहकाला लागल्याने जखमी झाला असून अज्ञात बंदुकधारी पसार झाले आहेत.लगेच तिरोडा व तुमसर मार्गावर बंदोबस्त लावण्यात आला.परंतु पोलिसांच्या हाती दरोडेखोर लागले नाही.श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले परंतु काहीही हाती लागले नाही.या दरोड्याच्या तपासासाठी तीन पथके तयार करुन विविध दिशेला रवाना करण्यात आली असून तिरोडा पोलीस  स्टेशनचे पोलीस निरिक्षक संदिप कोळी हे पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तपास करीत आहेत.