ती रक्कम नक्षल्यांनाच देण्यासाठी

0
7

आलापल्ली,दि.24 : गडचिरोली जिल्ह्यात तेंदुपत्ता हंगाम जोमात सुरू असून नक्षलग्रस्त भागात कंत्राटदारांकडून नक्षल्यांना मोठी रसद पुरविली जात आहे. या प्रकारावर पोलिस प्रशासन करडी नजर ठेवून असून पकडण्यात आलेली १ कोटी ७६ लाखांची रक्कम नक्षल्यांनाच देण्यासाठी नेली जात होती, अशी माहिती प्राणहिता पोलिस मुख्यालयाचे अपर पोलिस अधीक्षक ए. राजा यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आलापल्ली येथे २१ मे च्या मध्यरात्री एका नव्या कोऱ्या वाहनातून ७५ लाखांच्या रकमेसह तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. सदर रक्कम वरंगल येथील तेंदुपत्ता कंत्राटदार खलील उल रहमान याची आहे. ही रक्कम रहमान याचा व्यवस्थापक नागराजू पुट्टा याच्यासह चालक पहाडीया तापला व मलय्या तनकम याच्यासोबत घेवून जात होता. या तिघांनाही पकडण्यात आल्यानंतर यांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी बोटलाचेरू येथे १ कोटी १ लाख रूपये लपवून ठेवले असल्याचे व ही रक्कम नक्षल्यांपर्यंत पोहचविणार असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे बोटलाचेरू येथेही धाड टाकून रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक ए. राजा यांनी दिली आहे.