गुरुदेव आत्मानंदजी यांचे प्रवचन २७ पासून

0
17

नागपुर,दि.24:- श्री सिद्ध सन्मार्ग चे प्रमुख श्री गुरुदेव आत्मानंदजी यांचे प्रवचन व् शिबिर २७ व् २८ जुन रोजी होटल लोहारकर्स सिताबर्डी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सह आयोजक हरिश सिडाणा यानी अाज पत्रपरिषदेत दिली. या श्री सिद्ध सन्मार्ग च्या वतीने सन्मार्ग श्री विद्याध्यान आणि सुप्रामेंटल हिलींग शिबिराचे आयोजन असून यात उच्च कोटीची साधना शिकविल्या जाते. जे १० ते १५ मिनिटात उच्च अवस्थे मध्ये पोहचविली जाते. साधना केल्यामुळे शांती मिळते, एकाग्रता वाढते, विचार शक्ती स्मरण शक्ती , आपसात प्रेम, सकारात्मता आत्मविस्वास, आदि वाढत असून नकारात्मता नष्ट होते. तर या साधने मध्ये हिमालयन साधना आणि आध्यात्मिक हिलींग , ज्या मध्ये कर्म आणि शारिरीक आणि मानसिक समस्यांचे निराकरण होते. श्री. विद्या साधना ही सर्वात मोठी साधना आहे. यात प्राचिन गुप्त ज्ञान सांगून साधना केली जाते. या साधनेमुळे जिवनात व लहान मुलां मध्ये विशेष परिवर्तन होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले . पत्रपरिषदेला किशन वर्मा , डॉ कीर्ति लता गिलोरकर , जे एस पटेल, दीपक खुराना, निशिकांत घारे, दिवाकर रायपुरे, रविन्द्र देशपांडे उपस्थित होते.