पत्रकारांनी वाहिली प्रमोद सचदेव यांना श्रध्दांजली

0
11

गोंदिया,दि.24-दिवंगत पत्रकार प्रमोद सचदेव यांना श्रद्धांजली अर्पित करण्याकरीता 24 मे रोजी वरिष्ठ पत्रकार व मराठी पत्रकार संघाचे सचिव विरेंद्र जायसवाल यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्राम गृहात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, लघु वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत खंडेलवाल, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष एच एच पारधी, प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया चे अध्यक्ष अपूर्व मेठी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या निधनामुळे पत्रकार जगतात मोठी हानी झाली असून त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ति देवो व त्यांच्या आत्मेला शांती मिळो अशी प्रार्थना करुण पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त करीत श्रद्धासुमन अर्पित केले. या प्रसंगी उपस्थित पत्रकार सुब्रत पाल, खेमेन्द्र कटरे, हिदायत शेख, अतुल दुबे, रवि आर्य, संतोष शर्मा, संजय राउत, मुकेश शर्मा यांनी ही त्यांच्या निधनाबद्दल शब्दसुमनातून श्रद्धांजली वाहिली. या वेळी सावन डोये, महेंद्र बिसेन, राजेश बंसोड़, हरीश मोटघरे, प्रकाश तिड़के, बिरला गणवीर, चंद्रकुमार बहेकार आदि पत्रकार उपस्थित होते. शोकसभेचे संचालन जयंत शुक्ला यानी केले.