सिरपूर धरणात दोन युवकांचा बुडून मृत्यू

0
6

देवरी,दि.03- गोंदिया- जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील सिरपूरधरणात(मनोहरसागर) आज सकाळीच आपल्या गावातीलच मित्रासोंबत आंघोळीला गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सायकांळी उघडकीस आली. त्यामध्ये बंटी कोसरे आणि नितेश कोसरकर (रा.सिरपूरबांध) यांचा समावेश आहे.बंटी कोसरे या युवकाचा मृतदेह आढळला असून दुसरा मृतदेहाचा शोध सुरु आहे.देवरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजेश तटकरे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहीम सुरु आहे.