राज्यातील 19 उपनिबंधकाच्या बदल्या,भंडार्याचे क्षिरसागर नागपूरला

0
18

गोंदिया,दि.03- राज्यातील उपनिबंधक सहकारी संस्था, गट अ संवर्गातील १९ अधिकाऱ्यांच्या विनंती व मुदतपूर्व बदल्या शासनाने शनिवारी सहकार व पणन विभागाने जाहीर केल्या़ आहेत.त्यामध्ये भंडाराचे जिल्हा उपनिबंधक एस़ एऩ क्षीरसागर यांची उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे  नागपूर येथील प्रादेशिक संचालक, वस्त्रोउद्योग येथील नानासाहेब चव्हाण यांची बुलढाणा, नागपूर शहर २ चे उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांची विभागीय उपनिबंधक पुणे येथे, यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांची उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, नागपूर विभाग येथे,पुण्याचे विभागीय उपनिबंधक ए़.एम़.देशमुख यांची जिल्हा उपनिबंधक सोलापूर येथे, जालनाचे जे़बीग़ुट्टे यांची औरंगाबाद येथे विभागीय उपनिबंधक पदावर बदली, नाशिकच्या उपनिबंधक मीना वि़ आहेर यांची विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग येथे, अमरावतीचे किरण गायकवाड यांची पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असो, पुणे येथे उपनिबंधक पदावर बदली, नागपूर विभागातील सचिन घोडके यांची जी़ एऩ मुंबई विभाग येथे बदली, कोल्हापूर शहर उपनिबंधक सं़ वि़ निकम यांची आऱ विभाग मुंबई येथे बदली, उप सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे येथील पी़ एस़ सोनवणे यांची मुंबई २ येथे जिल्हा उपनिबंधक या पदावर बदली, बुलढाणा येथील डी़ एम़ पालोदकर यांची जालना,  पुणे येथील कृषी व्यापार विषयक पायाभूत सुविधा विकास गुंतवणुक प्रकल्प उपसंचालक एस़ यु़ शिरापूरकर यांची विभागीय उपनिबंधक पुणे येथे बदली, पुणे येथील विभागीय उपनिबंधक प्रशांत सुर्यवंशी यांची पुणे शहर १ येथे उपनिबंधक पदावर बदली, तळेगांव दाभाडे येथील उपनिबंधक एस़ एम़ तांबे यांची पुणे येथे उपनिबंधक पदावर बदली, पुणे शहर १ चे उपनिबंधक अमोल यादव यांची उपसंचालक (अभियांत्रिकी) कृषी व्यापार विषयक पायाभूत सुविधा विकास गुंतवणूक प्रकल्प, पुणे येथे बदली,याशिवाय पुणे येथील उपनिबंधक पी़ एम़ बर्गे यांची उस्मानाबाद येथे तर जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांची यवतमाळ येथे जिल्हा उपनिबंधक पदावर बदली करण्यात आली आहे़.