मुंगनेर जंगलात दोन महिला नक्षली ठार,पोलिसांची कारवाई

0
13

गडचिरोली,दि.११ : गडचिरोली जिल्ह्यातंर्गत येत असेलल्या धानोरा पोलीस ठाण्यांतील मुंगनेर जंगल परिसरात आज ११ जुलै रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या पोलीस – नक्षली चकमकीत दोन महिला नक्षलीं ठार झाले असून आत्तापर्यंत तीन महिला नक्षल्यांनी ठार मारण्यात पोलीसांनी यश आले आहे.सदर दोन्ही नक्षली कंपनी क्र. ४ दलमचे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर कारवाईत दोन रायफलीसह नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे.
धानोरा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मुंगनेर जंगल परिसरात आज नक्षल विरोधी अभियानाचे जवान शोध मोहिम राबवित असतांना सकाळच्या सुमारास नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. प्रतिउत्तरादाखल जवानांनीसुद्धा नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. चकमकीनंतर सदर घटनास्थळावर शोध मोहिम राबविली असता दोन महिला नक्षल्यांचे शव आढळून आले. दोन्ही नक्षलींची ओळख पटली नसली तरी सदर नक्षली कंपनी क्र. ४ दलमचे असल्याचे समजते..
काल कुरखेडा तालुक्यांतर्गत येत असलेल्या मालेवाडा पोलीस हद्दीतील रानवाही जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये एका महिला नक्षलीस ठार करण्यात आले होते. या माहितीच्या अनुषंगाने नक्षली सदर जंगल परिसरात लपून असल्याची गुप्त माहिती नक्षल विरोधी अभियानपथकाच्या जवानांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे आज, मुंगनेर जंगल परिसरात शोध मोहिम राबवित असतांना सी 60 जवानांची नक्षल्यांशी गाठ पडली. या चकमकीतही दोन नक्षलींना ठार करण्यात आले.