सहलीला आलेल्या दोन तरुणांचा कन्हान नदीत बुडून मृत्यु

0
18

नागपूर,दि.27- जिल्ह्यातील वाकी येथे कन्हान नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेले दोघे सावनेर येथील राहाणारे आहेत. रजन राजेश पन्नामी (वय- 22), राहुल विक्की मेंढूले (वय- 22) अशी मृतांची नावे असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.मिळालेली माहिती अशी की, खापा पोलिस ठाण्याचे हद्दीतील वाकी येथील आज (गुरुवारी) दुपारी साडे चार वाजता ही दुर्घटना घडली. सावनेर येथील सहा तरुण वर्षा सहलीसाठी कन्हान नदीवर गेले होते. तिघे नदीच्या पात्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यापैकी एक थोड्क्यात बचावला. मात्र, दोघांचा मृत्यू झाला. सावनेरचे तहसीलदार राजू रणवीर, खापा पोलिस घटनास्थळावर पोहोचले आहेत.