भाजपाच्या समर्थनामुळे जेडीयूत फूट

0
10

पटना, दि. 27 – बिहारमधील महाआघाडी फुटल्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन करणारे नितीश कुमार यांच्याविरोधात पक्षांतर्गत राजकारण ऊभे ठाकले आहे. नितीश कुमारांवर नाराज असलेले आमदार बंडखोरी करण्याच्या मानसिकतेत आहेत. जेडीयूचे नेते शरद यादव आणि अली अनवर या बंडखोरांना स्वतःच्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न नितीशकुमार करत आहेत.
शरद यादव हे नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळी हजर नव्हते. यादव यांंनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतल्याचे कळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद यादव आज संध्याकाळी अली अनवर आणि पार्टीच्या इतर असंतुष्ट नेत्यांची बैठक आपल्या निवासस्थानी घेणार असून या बैठकीत पुढील रणनीती आखली जाणार आहे. शरद यादव यांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपदही दिलं जाऊ शकतं. जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी आज या सर्व प्रकारावर मीडियासमोर उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. शरद यादव म्हणाले होते, नितीश कुमार यांनी सरकार बनवण्याचा निर्णय खूपच घाईघाईत घेतला होता. एवढ्या लवकर महाआघाडी तोडून भाजपाच्या समर्थनानं सरकार बनवण्याच्या निर्णयाचं मी समर्थन करू शकत नाही. 2013ला भाजपाशी युती तुटल्यानंतर शरद यादव यांनी भाजपावर उघड हल्लाबोल केला होता. जेडीयूचे खासदार अली अनवर यांनीही अंतरात्म्याचा आवाज ऐकून नितीश कुमाराच्या निर्णयाला समर्थन देऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे. जेडीयू प्रवक्ते नीरज कुमार म्हणाले, पक्षाचा हा निर्णय सर्वांच्या संमतीनं घेण्यात आला आहे. ज्यांना या निर्णयावर नाराजी आहे, त्यांनी पक्षाच्या बैठकीत तो मुद्दा उपस्थित केला पाहिजे होता. भाजपासोबत सरकार बनवल्यामुळे नितीश कुमार आरजेडी आणि काँग्रेस यांच्या रडारवर आहेत.
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून मी न्यायालयीन लढाई लढत आहे. पण मला शिक्षा सुनावताना घाई करण्यात आली. नितीश कुमार आणि भाजपाने रचलेलं हे षडयंत्र होतं’, असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला. ‘नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बिहारमधून बाहेर काढण्यासाठी लोकांनी भाजपविरोधात जाऊन आम्हाला कौल दिला होता. गोमांस खाल्लं पाहिजे असं मी सांगितल्याचा खोटा प्रचार करण्यात आला, आम्ही जिंकलो तर पाकिस्तानात फटाके फुटतील असंही सांगण्यात आलं होतं’, अशी माहिती लालूप्रसाद यादव यांनी दिली. नितीश कुमार खूप मोठे संधीसाधू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे प्लानिंग सुरु असल्याची आम्हाला माहिती होती, आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.