नांदेड-हैदराबाद महामार्गावर अपघात; तीन ठार, तीन जखमी

0
11

नांदेड,दि.18(नरेश तुप्टेवार):येथील नांदेड-हैदराबाद महामार्गावर मोटारीने ट्रकला समोरून जोरदार धडक दिल्याने या अपघातात तीन ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारला पहाटे घडली.शिर्डी येथून दर्शन घेऊन परतत असताना आज पहाटे नायगाव जवळील पळसगाव फाट्यावर हा अपघात झाला.जखमींवर नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कर्नुल जिल्हयातील रणजीतकुमार हे कुटूंबासह शिर्डीला दर्शनासाठी गेले होते. शिर्डीवरुन परतत असताना अपघात झाला. मोटार चालक बुध्दु कॅटल याचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटारीने दुभाजकाला धडक दिली आणि त्यानंतर नायगावकडून नांदेडकडे जाणा-या ट्रकला समोरुन धडक दिली. या धडकेत मोटार चालक बुध्दु कॅटल, अनुराधा रजणीतकुमार आणि सात वर्षाची मुलगी रुषीता रंजीतकुमार असे तीघे जण जागीच ठार झाले. रणजीत कुमार अन्य दोन जखमींना नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.