ट्रव्हल्स उलटल्याने मायलेकीसह ४ ठार:११जखमी

0
7

वन्नाळी टोल नाक्याजवळील घटना

नांदेड,दि.२४(नरेश तुप्तेवार)@-देगलूर येथून ७ कि. मि. अंतरावर असलेल्या वंन्नाळी येथील कल्याण टोल नाक्याजवळ देगलूरहून नांदेड कडे जाणार्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे वाहनाचा ताबा सुटून ट्रॅव्हल्स उलटल्याने जागीच ४ जण ठार तर ११ जण जखमी झाल्याची घटना आज २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३.१५ वा. च्या सुमारास घडली 
    याबाबत सविस्तर वृत्त असे की,देगलूर येथील लक्ष्मीनारायण खाजगी ट्रॅव्हल्स देगलूररहून जवळपास २५ प्रवाशी घेऊन नांदेडकडे जात असताना खानापूर फाटा येथे ट्रॅव्हल्समध्ये बिघाड आल्याने बंद पडली तदनंतर त्या ट्रॅव्हल्स ला ढकलून चालू करून अगोदरच्या चालकाच्या जागी दुसऱ्या चालकाच्या हाती ट्रॅव्हल्स देण्यात आल्यामुळे सदरील ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने पळवून  वन्नाली येथील कल्याण टोल नाक्या समोर येताच निष्काळजीने  चालकाचा ताबा सुटून ट्रॅव्हल्स उलटल्याने गाडीचे पत्रा कुजलेले असल्याने त्या मधील ४ प्रवाशी अर्धवट बाहेर फेकले गेल्याने त्यांचा ट्रॅव्हल्स खाली दबून जागीच मृत्यू झाला त्यात सुनीता निवृत्ती कांबळे, वय २९ वर्ष रा. सिदार्थ नगर देगलूर,कु. शितल निवृत्ती कांबळे वय ९ वर्ष रा. सिद्धार्थ नगर देगलूर,गंगाधर परमेशु भुरले वय ५० वर्ष रा. थंडी हिप्परगा मंडळ मदनूर,मारोती बरबडेकर वय ३५ वर्ष रा बरबडा, या ४जणांचा जागीच ठार झाले. गंभीर जखमीत जैतूनबी सरवर कुरेशी,वय ६० रा बेटमोगरा ता मुखेड,कपिल बाबू गायवले वय २२ रा. आळंदी ता बिलोली, श्रीकांत अनिल जोरगुलवार वय १६ रा. वंनाली,गंगाधर दशरथ दरेंगावे वय ४५ रा धुप्पा,जिजाराम कांशीराम वानलवारवय३५ रा राणीसावरगाव जिल्हा परभणी नि५ जन गंभीर तर ६ जन किरकोळ जोखमीचे नवे पुढील प्रमाणे किशोर नेमाजी शेळवे वय ४४ साधना नगर देगलूर,बजरंग तेजेेराव गायकवाड वय ११ रा मुस्तपूर, अनिल मारोती चिटमलवार वय २१ रा आळंदी ता बिलोली,मन्मथ हणमंत दरेंगावे रा धुपा,कृष्णा हणमंत गोपी वय १७सिद्धार्थ नगर देगलूर,संतोष संजय राऊत वय १७ रा.मरखेल ता. देगलूर यांच्यावर देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहे तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे  हलविण्यात आले
     ट्रॅव्हल्स खाली अडकलेल्या मृत देह काढण्यासाठी वनाळी येथील स्थानिक नागरिकांनी ट्रॅव्हल्स उभी करण्यास मदत केले तर घटनास्थळी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार,उपनगराध्यक्ष बालाजी टेकाळे, शरीफ मामु,लालू कोयलावार,संतोष पाटील, आदींनी जखमींना उपचारासाठी मदत केले 
     याघटनेत सिद्धार्थ नगर येथील माय लेकीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
     या घटनेतील मृतांचे शवविच्छेदन व गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे