जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक

0
9

गोंदिया,दि.24 : जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीची माहिती २३ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवून संपूर्ण परिस्थितीवर चर्चा केली . यावर मुख्यमंत्र्यांनी या बाबीला घेवून उपाययोजना करण्यासाठी संबधित विभागाला निर्देश दिले. तसेच दुष्काळ परिस्थिीचा त्वरित आढावा घेण्याचे निर्देश देवून शेतकऱ्याना सर्वपरीने मदतीचे आश्वासन दिले.
जिल्ह्यात यावर्षी पाऊस वेळेवर व समाधानकारक न आल्याने मोठ्या प्रमाणात पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे धानपिकांवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात शेतक-यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. या संदर्भात पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यात दौराकरून पिक परिस्थितीची पाहणीकेली होती. तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना जिल्हा दुस्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्याना आर्थिक मदत करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. या अनुषंगाने २३ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्याची सर्व परिस्थिती बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या समस्येबाबत सकारत्मक प्रतिसाद देत सर्वेक्षण करून पंचनामा तयार करण्यासंदर्भात निर्देश दिले. दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री राजकुमार बडोले यांना जिल्ह्यातील शेतक-याच्या परिस्थितीबाबत माहिती देवून जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्याना मदत करण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने माजी खासदार खुशाल बोपचे, माजी आमदार खोमेश रहांगडाले, माजी आमदार भेरसिंह नागपूरे,माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे,विरेंद्र अंजनकर,रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर आदि उपस्थित होते.