9 नवे चेहरे घेणार शपथ, 4 माजी अधिकारी

0
6
नवी दिल्ली,दि.03(वृत्तसंस्था)- पंतप्रधान नरेंद्र माेदी रविवारी आपल्या मंत्रिमंडळात तिसरा मोठा फेरबदल करतील. राष्ट्रपती भवनात सकाळी १०.३० वाजता शपथविधी होईल. मंत्रिमंडळात नवीन ९ चेहऱ्यांचा समावेश केला जात आहे. यात चार निवृत्त सनदी अधिकारी आहेत. पैकी दोन आयएएस, एक आयपीएस, एक आयएफएस अधिकारी राहिलेले आहेत. कॅबिनेटमध्ये केरळला प्रथमच प्रतिनिधित्व मिळाले आहेत. माजी आयएएस अल्फोन्स कन्ननाथन यांचा समावेश होऊ शकतो. ते केरळ केडरचे अधिकारी राहिलेले आहेत.
आज (रविवारी) सकाळी दहा वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नव्या मंत्र्यांकडे महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. फेरबदलाचा एक भाग म्हणून विद्यमान सहा मंत्र्यांनी राजीनामे दिले असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच विद्यमान तीन मंत्र्यांना बढती मिळणार आहे, तसेच काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
तत्पूर्वी, या संदर्भात आपल्याकडे केंद्रीय पातळीवरून कोणतीही विचारणा झाली नसल्याचे संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
यूपी, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटकातील चेहऱ्यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश होईल. वृंदावनमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा करून परतलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीनंतर पीएम मोदी यांनी फेरबदलाला अंतिम रूप दिले. त्यांनी स्वत: बायोडेटा पाहून नावे निश्चित केली. तत्पूर्वी शहांनी संभाव्य मंत्री व खातेबदल होणाऱ्या मंत्र्यांशी चर्चा केली. फेरबदलाआधी सात मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. अनेक मंत्र्यांच्या खात्यांत बदलासह काहींना चांगल्या कामासाठी प्रमोशन मिळू शकते. एनडीएमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या जदयू तसेच शिवसेना आणि अण्णाद्रमुकचा कॅबिनेटमध्ये समावेश होण्याची शक्यता नाही.