उद्योग समूहांनी शेतकर्यांसाठी पुढे यावे-ना.मुनगंटीवार

0
21

चंद्रपूर,दि.03 : चंद्रपूर जिल्हयाच्या औद्योगिक विकासामध्ये स्थानिक उद्योग समूहांचा फार मोठा सहभाग आहे. या ठिकाणी मोठया रोजगाराच्या संधी आपल्या मार्फत उपलब्ध झाल्या आहेत. मात्र औद्योगिक विकासासोबत आपला शेतकरी बांधव चिंताग्रस्त असणे प्रगत समाजाचे लक्षण नाही. त्यामुळे शेतकºयांच्या जीेवनात परिवर्तन आणण्यासाठी विविध योजनांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवा, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील मोठया उद्योग समूहांची महत्वाची बैठक ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांच्यासह, आमदार नाना शामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर आदींची उपस्थिती होती.यावेळी उद्योग समूहाच्या समस्याबद्दल ना.मुनगंटीवार यांनी माहिती घेतली. जिल्हयातील शेतकºयांच्या उत्पन्नाला दुप्पट करण्याचे धोरण असून त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तयार केलेल्या पंचसुत्रीवर सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी केले.
उद्योग समूहामध्ये स्थानिक मुलांना अधिक रोजगार मिळावा, यासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम सूचविण्यात यावे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मुलांना शिकत असतानाच उद्योग समूहामध्ये सरावासाठी व औद्योगिक भेटीसाठी पुढाकार घेण्यात यावा, शेतकºयांसाठी वेगवेगळी मदत करण्याऐवजी सामूदायिकरित्या उपयोगी ठरेल, अशा पध्दतीच्या यंत्र खरेदीसाठी जिल्हाधिकाºयांनी कृषी यंत्र बँक सुरु केली असून अनेक गावांमध्ये भाजीपाला क्लस्टर सारखे नवे प्रयोग होत आहे. यासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात यावी. पुढील वर्षीच्या वृक्षलागवडीमध्ये अधिसूचित केलेल्या चौदा वृक्षांच्या नर्सरी सुरु करण्यात याव्या. यातून निर्धारित रोपे वाढविण्यात यावी. मानव विकास नामांकनामध्ये मागे असणाºया पाच तालुक्यांना रोजगारयुक्त तालुके बनविण्यामध्ये सहभाग नोंदवावा, अशा अपेक्षा ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.