इसिसच्या नावाने मुंबई विमानतळावर हल्ला करण्याची धमकी!

0
10

मुंबई – भारताच्या येत्या प्रजासत्ताक दिनी मुंबई विमानतळावर दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी इसिसच्या नावाने विमानतळाच्या शौचालयातील भिंतीवर दिली गेली आहे. मागील आठवड्यातही अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती. भारत दौर्‍यासाठी २५ जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे तीन दिवसांच्या येत आहेत. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे ओबामा प्रमुख अतिथी आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रजासत्ताक दिन सोहळ्याला येण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे भारत सरकारने सुरक्षा यंत्रणांना कडक सूचना दिल्या आहेत.

प्रजासत्ताक दिन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे उपस्थित राहणार असल्यामुळे पाकिस्तानमधील कट्टरवादी लोकांचा तीळपापड झाला आहे. ओबामांच्या दौ-यावेळी भारतात हल्ला करून दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर हल्ला करण्याच्या धमकीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

दरम्यान, भींतीवर लिहलेला संदेश हा येथील भुरट्या इस्लामिक कट्टरवाद्यांनी लिहला असण्याची शक्यता पोलिस पडताळून पाहत आहेत. मागील आठवड्यातही अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती. मात्र ती केवळ धमकीच ठरली होती. असे असले तरी ओबामांच्या दौ-यामुळे सुरक्षा यंत्रणांनी कोणतेही कसूर न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.