हनीप्रीत इन्साने अखेर पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण

0
17

नवी दिल्ली,दि.03(वृत्तसंस्था) –  मागच्या महिन्याभरापासून फरार असलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर मंगळवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ती हरयाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. हनीप्रीत बाबा गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. राम रहीम साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. हनीप्रीतने आत्मसमर्पण करण्याआधी माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यात तिने आपली बाजू मांडली.
राम रहीम आणि ती पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा तिने केला. वडिलांबरोबर आपल नातं पवित्र असल्याचं हनीप्रीतने या मुलाखतीत सांगितले. हनीप्रीतचा पूर्वपती विश्वास गुप्ताने हनीप्रीतचे राम रहीमबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. मी राम रहीम आणि हनीप्रीतला एकत्र नेकेड,  सेक्स करताना बघितले होते असे विश्वास गुप्ताने पत्रकार परीषदेत सांगितले होते. 25 ऑगस्टला पंचकुला न्यायालयाने राम रहीमला साध्वींवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. त्यानंतर हरयाणा, पंजाब आणि दिल्लीमध्ये जोरदार हिंसाचार झाला. या सर्व घडामोडींनंतर हनीप्रीत गायब झाली. तिच्यासह डे-यातील काही सदस्यांवर हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे.हनीप्रीत नेपाळला पळून गेल्याचीही चर्चा होती.

 मीडियावर आरोप लावताना हनीप्रीत म्हणाली, ज्या हनीप्रीतला तुम्ही दाखवले ती हनीप्रीत तशी नाहीये. हनीप्रीतचे ज्या प्रकारचे चित्रं उभे केले त्यामुळे मी स्वतःही हनीप्रीतला घाबरायला लागली आहे. मी माझी मानसिक स्थिती सांगू शकत नाही. मला देशद्रोही म्हटले गेले हे साफ चुकीचे आहे. जी मुलगी तिच्या वडिलांसोबत देशभक्तीबाबत बोलायची तेच तुरूंगात गेल्यावर मी असहाय झाली होती. नंतर माझ्यावरच देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले. वडील तुरूंगात गेल्यावर मला माझ्या जवळ असलेल्या व्यक्तींनी जो सल्ला दिला मी त्याप्रमाणेच वागली, मला काही समजत नव्हते. मी हरियाणातून कशीतरी दिल्लीला गेले. आता हरियाणा-पंजाब कोर्टात जाणार आहे. पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पणाच्या प्रश्नावर हनीप्रीत म्हणाली की, यासाठी ती कायदेशीर सल्ला घेणार आहे.