विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंविरोधात औरंगाबाद कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट

0
14

औरंगाबाद- कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधी अपहार प्रकरणी कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीस सतत गैरहजर राहिल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना औरंगाबाद कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
बागडे यांच्या देवगिरी ट्रस्टमधील कर्मचा-यांच्या मासिक वेतनातून दरमहा भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करण्यात येत होती. मात्र, कपात केलेली रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा न केल्याने बागडे यांच्या विरोधात 2006 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी त्यांच्याविरोधात औरंगाबाद कोर्टात खटला सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून बागडे खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिले. त्यामुळे औरंगाबाद कोर्टाने बागडेंच्या विरोधात आता थेट अजामीनपात्र वॉरंट बाजवले आहे. या प्रकरणी येत्या 11 फेब्रुवारीला होणा-या सुनावणीस हजर राहण्याचे आदेश बागडे यांना कोर्टाने बजावला आहे. त्यामुळे बागडे आता तरी उपस्थित राहणार का याकडे लक्ष आहे. तसेच बागडे कर्मचा-यांच्या पीएफबाबत काय भूमिका घेतात हे पाहणेही तेवढे महत्त्वाचे ठरणार आहे.