पवार आणि माझा मार्ग वेगळा पण ध्येय एकच देशाचा विकास- नरेंद्र मोदी

0
12

पुणे/बारामती- शरद पवार आणि माझे राजकारणातील मार्ग वेगळे आहेत. तरीही आमचे ध्येय मात्र एकच आहे ते म्हणजे देशाचा विकास. त्यामुळेच राजकीय विचार वेगळे असले तरी राष्ट्रनिती महत्त्वाची आहे. शरद पवार अनुभवी नेते आहेत. त्यांच्यात माझ्यात संवाद आहे. आमच्यात महिन्यातून दोन-तीनचा विचारमंथन होते. त्यांच्यासारख्या नेत्याचे मार्गदर्शन माझ्यासारख्याने जरूर घेतले पाहिजे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांच्या दृरदूष्टीचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत दाखल झाले आहेत. 12 च्या सुमारास नरेंद्र मोदी चाकणहून बारामतीत दाखल झाले. बारामतीतील विमानतळावरून पंतप्रधान थेट विद्या प्रतिष्ठानमधील शैक्षणिक संकुलात दाखल झाले आहेत. तेथील संपूर्ण शैक्षणिक संकुलाची व पवारांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या संग्राहलयाची पाहणी केली. त्यानंतर शारदानगर- माळेगाव येथील विज्ञान कृषि केंद्राची पाहणी केली. पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट,माजी मंत्री खासदार प्रफुल पटेल, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित आहेत.
बारामतीच्या शेतकर्‍यांमध्ये मती आणि गती आहे, जिथे मती आणि गती असते तिथे प्रगती असते.वाद आणि संवादातून लोकशाही विकसित होते.
पवार आणि माझा पक्ष वेगळा, राजनिती वेगळी असली तरी राष्ट्रनिती सारखीच असली पाहिजे.शरद पवारांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे… त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. मी त्यांच्यासारख्या नेत्यांकडून काही शिकले पाहिजे, त्यांचा अनुभव, मार्गदर्शन घेतले पाहिजे. पवार आणि माझा फोन नाही असा एकही महिना जात नाही.शेतक-यांच्या गरजा व अपेक्षा अजून पूर्ण करायच्या आहेत.पाण्यासाठी योग्य नियोजन हवे, खूप पाणी शेतीला देणे पाप आहे. मिडियासाठी आजचा दिवस विशेष आहे, मोदी पूर्वी काय बोलले व आज काय बोलणार यावर लक्ष ठेवून आहेत. शेतीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय, नियोजन करणं आवश्यक आहे. अॅग्रो टेक्नॉलॉजीवर भर देणं आवश्यक, कृषीक्षेत्राला आधुनिकतेकडे नेण्याची गरज असल्याचे मोदी विद्या प्रतिष्ठानमधील कायर्क्रमात बोलत होते.पुढे मोदी म्हणाले की, गुजरातमध्ये मला काही अडचणी आल्या तर मी शरद पवार यांचे विचार घ्यायचो. पण आम्ही वेगळ्या पक्षाचे लोक एकत्र आलो की का मोठ्‌या बातम्या बनतात हेच मला कळत नाही.आम्ही राजकारणात आहोत पण आमच्यासाठी राष्ट्रनीती महत्वाची असते असेही सांगत त्यांनी पवार यांच्या कायार्चा गौरव करीत अप्पासाहेबानी पेरलेले रोपटे आज शरद पवार आणि त्यांच्या सहकायर्ामुळे वाढल्याचे म्हणाले.