कौशल्याभिमुख शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल

0
19

शहापूर : एमआयईटी भंडारा येथील शैक्षणिक, तांत्रिक शिक्षण कौशल्याभिमुख आहे. एमआयईटीच्या स्थापनेच्या पाच वर्षात केलेल्या प्रगतीने या संस्थेची नजीकच्या काळात राज्यातील उत्कृष्ठ तांत्रिक संस्था म्हणून निश्‍चितच गणना होईल, असा मला विश्‍वास आहे. त्या दिशेने गोंदिया शिक्षण संस्थेची वाटचाल सुरूआहे, असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य राजेंद्र जैन यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या संशोधन व तांत्रिक गुणांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने स्थानिक मनोहरभाई पटेल इंस्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजी मध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरच्या तीन दिवसीय टेक्नोसंस २0१५ स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. टेक्नोसंस २0१५ चे आ. राजेंद्र जैन यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून उद््घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर बीएसएनलचे सहायक महाप्रबंधक अरविंद पाटील, प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, एमआयईटीचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे, प्रा. कपिल कोकणे, प्रा. मोहमद नासीर, प्रा. आशिष ठाकरे, विद्यार्थी प्रतिनिधी आलोक कानेकर व अमित मलेवार उपस्थित होते. आयआयटी मुंबई, एआरके टेक्नोलॉजी सोलुशन यांच्या सहकार्याने आयोजित टेक्नोसंस २0१५ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील शोधनिबंध स्पर्धा, तांत्रिक प्रकल्प सादरीकरण, रोबोरेस, रोबोसॉकर, लॅन गॅमीन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. एआरके टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने स्वनिर्मित रोबोट या सर्व स्पर्धाचे आकर्षन ठरले होते. स्पर्धेत मधुकरराव पांडव अभियांत्रिकी अँड टेक्नॉलॉजी, मौदा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद, शासकीय तंत्रनिकेतन साकोली, केडीके अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर व दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील चमूने सहभाग घेतला.
टेक्नोसंस २0१५ ची सांगता बक्षिस वितरण कार्यक्रमाचे करण्यात आली. समारोप कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून आयएएस अधिकारी राहुल द्विवेदी, एमआयईटी गोंदियाचे प्राचार्य डॉ. एस.एस. राठोड, सनफ्लॅगचे प्रबंध निदेशक प्रभाकर कोलतेवार, अशोक लेलँडचे एम.एन. लखोटे, एमआयईटीचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे यांनी केले. एमआयईटीमध्ये राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. आजच्या स्पर्धेच्या युगात समोर जाण्याकरिता आवश्यक महत्वाच्या घटकाविषयी मुख्य अतिथी राहुल द्विवेदी यांनी मार्गदर्शन केले.
रोबोरेसमध्ये प्रथम आलेल्या अमिन चेटुले याचा आयआयटी मुंबई येथे होणार्‍या अंतिम स्पर्धेकरिता निवड झाली आहे. टेक्नोसंस २0२५ च्या यशस्वी आयोजनकरिता सर्व स्पर्धा संघटकासह प्रा. कपील कोकणे, प्रा. आशिष ठाकरे, प्रा. मो. नासीर व विद्यार्थी प्रतिनिधी आलोक कानेकर व अमित मालेवार यांनी सहकार्य केले.