एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे बैठकीत सकारात्मक तोडगा

0
16

मुंबई,दि.09(वृत्तसंस्था) : पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटवण्यात अखेर राज्य सरकारला यश आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. याच पार्श्वभूमीवर सर्व कामगार संघटना आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर संघटनांनी संप मागे घेत असल्याचं जाहीर केले.

वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 8 तारखेच्या मध्यरात्रीपासून अचानक संप सुरु केला. आचनक केलेल्या या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. यावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत यांनी बैठक घेतली या बठकी मध्ये सकारात्मक तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली.संप मागे घेतल्याने राज्यातील प्रवाश्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. संप मागे घेऊन इतर कर्मचाऱ्यांना कामावर हजार होण्यास सांगावे, असे आवाहन त्यांनी यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केले. एसटी कर्मचाऱ्यांनी संपादरम्यान केलेल्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांवर कारवाई होईल. इतर कारवाईतून त्यांना मुक्त करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.