१६ दहशतवाद्यांच्या सुरक्षा दलाने आवळल्या मुसक्या

0
10

नवी दिल्ली – आसाम राज्यात सुरक्षा दलाकडून राबविलेल्या दोन वेगवेगळ्या मोहीमांमध्ये १६ दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यामध्ये आसाम राज्यात बंदी घातलेल्या वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्तेही सामिल आहेत.

सुरक्षा दलाने १४ दहशतवाद्यांसोबत बंदी घालण्यात आलेल्या रब्बा नॅशनल लिबरेशन फ्रंट या संघटनेच्या कार्यकर्त्यांला पहिल्या घटनेमध्ये राज्यातील गोलपारा जिल्ह्यात अटक केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले सर्व दहशतवादी या आठवड्यात जिल्ह्यात एका ठिकाणी रेल्वे रुळ बॉम्बस्फोटाने उडवण्याच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात संशयित आहेत.

दुसऱ्या एका घटनेत सुरक्षा दल आणि राज्याच्या पोलिसांनी केलेल्या संयुक्त मोहीमेत नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड – साँगबीजीत संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कोकराझार जिल्ह्यात अटक केली.