टोलमुक्तीचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडू, रावतेंशी चर्चेनंतर गडकरींचं आश्वासन

0
9

नवी दिल्ली : टोलमुक्त महाराष्ट्राबाबत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. भेटीनंतर गडकरींनी टोलमुक्तीचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याचं आश्वासन दिलं आहे.

महाराष्ट्रात टोलमुक्तीची घोषणा झाल्यानंतर हा निर्णय प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दिवाकर रावते दिल्लीत गडकरींच्या भेटीला आले. भेटीत टोलमुक्त महाराष्ट्राबाबत दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली. चर्चेनंतर नितीन गडकरींना टोलमुक्तीचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याचं आश्वासन दिलं आहे.

आश्वासनानंतर टोलमुक्तीचं दिवास्वप्न प्रत्यक्षात कधी उतरणार याकडे सामान्य नागरिकांचं लक्ष लागलेलंआहे.